मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत.त्यांच्या या दौऱ्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईहून थेट दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांचा हा दौरा गोपनीय ठेवण्यात आला असून त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.दिल्लीत पोहचल्यानंतर उपमुख्यमंत्री भाजपच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.राज्यातील आगामी राजकीय घडामोडी किंवा प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याचे अधिकृत कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- चिपळूणच्या परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये ‘दि चिपळूण अर्बन बँके’कडून शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षकांचा विशेष सन्मान व शुभेच्छा…!
- विजयराव गुजर यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार..
- पोफळी गावच्या तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते दिलीप मोहिते यांचे बिनविरोध निवड…
- रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ५७८ दहीहंड्या..
- विक्रम साबळे फाउंडेशनच्या मंगळागौर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…