लांजा : लांजा ते माचाळ एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. लांजा तालुक्यातील दुर्गम, निसर्गरम्य आणि ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळ गावाच्या इतिहासात प्रथमच राज्य परिवहन महामंडळाच्या लांजा आगारातून एसटी बस सेवा सुरू करण्यात आली.

समुद्रसपाटीपासून खूप उंचावर आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या माचाळ गावात यापूर्वी जाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. आमदारांच्या माध्यमातून गावापर्यंत रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून एसटी बस सेवा सुरू करण्यात आली.

यावेळी लांजा आगारप्रमुख प्रकाश झोरे, राजू पाटोळे, रमेश खानविलकर, विद्यानंद कुवेशकर, ललित दांडेकर, एस. एस. माळी, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, जिल्हा परिषद सदस्य गांगण आदी मान्यवर उपस्थित होते.