चिपळूण : चिपळूण शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील कर्तुत्ववान व प्रभावशाली महिलांचा सन्मानआणि गौरव सोहळा नुकताच पार पडला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा सोहळा दिनांक १४ मार्च रोजी या प्रभागातील राधाकृष्ण नगर मधील मुथप्पन मंदिराच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

या प्रभागातील नगरसेविका अंजली कदम व नगरसेवक शशिकांत मोदी यांच्या विद्यमाने व यांच्यातर्फे हा सन्मान व गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रभागातील १८ महिलांचा यथोचित सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माझी गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी सौ.सशाली मोहिते उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना सषाली मोहिते यांनी प्रतिपादन केले की, संविधानाने आपल्याला समान अधिकार व कर्तव्य दिलेले आहेत आणि संविधान फक्त स्त्री आणि पुरुष या दोनच जाती मानते. त्यामुळे आपले जसे अधिकार आहेत तसेच आपले कर्तव्य आहेत हेही आपण समजून घेतले पाहिजे आपल्याला ५० टक्के स्त्री म्हणून आरक्षण मिळालेले आहे कारण समाजामध्ये दोघांची संतुलन राखण्यासाठी हे अधिकार समान मिळालेले आहेत. यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना आवाहन केले की आपण संविधानाची प्रत जरूर आपल्या घरी ठेवावी जसे आपण इतर पुस्तके आणि धार्मिक ग्रंथ घरी ठेवतो त्याचप्रमाणे मानव विकासासाठी आणि अभ्यासासाठीआणि मुलांना त्याची खास जाणीव करून देण्यासाठी संविधानाची प्रत प्रत्येकाच्या घरी असणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरसेविका अंजली कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी प्रतिपादन केले की समाजामध्ये महिला सक्षमीकरण दिसून येते आणि म्हणूनच अनेक महिला सामाजिक जबाबदारी उत्तम पद्धतीने निभवताना दिसून येतात अशाच महिलांचा आपण सत्कार आणि सन्मान करत आहोत ही अत्यंत समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे.यावेळी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी प्रास्ताविक आणि आपले मनोगत व्यक्त केले आणि प्रत्येक स्त्रीला समाजामध्ये समान पातळीवर राहण्याचा आणि जगण्याचा अधिकार असल्याचे हे त्यांनी मत मांडले.या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्ष नगरसेविका रसिका देवळेकर तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर व रूपाली आवले यांची उपस्थिती होती . त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनिय कार्य करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला . यामध्ये सन्मानमूर्ती सशाली मोहते,,समृद्धी पाटिल , सायली आंबुर्ले ,कारदगे मॅडम , निधी ताठरे , प्राची जोशी , ज्योती कान्हेरे मॅडम , रूपाली आवले, डॉ भक्ति पालांडे , प्रियांका कारेकर , प्राध्यापक संगीता जोशी , जयश्री जोशी , रेवती घाग जुई बापट, सुखदा परांजपे , जयश्री पवार , देवधर मॅडम यांना सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी प्रियांका कारेकर , प्राची जोशी , कान्हेरे मॅडम यांनी आपली मनोगते व्यक्त केली . या कार्यक्रमाला नगरसेविका वैशाली निमकर , नगरसेविका राणी महाडिक शहर सरचिटणीस सारीका भावे , संदेश किंजळकर , पूजा कदम , माधुरी शिंदे , शिवसेना चिपळूण शहर अध्यक्ष प्राजक्ता टकले , ज्योती देसाई , शैलजा लांडे , सीमाताई चाळके , अर्चना कारेकर , रुचिता कदम ,नीता शेलार , प्रतिमा शिंदे ,ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम , ॲड. संजय पाटील , ॲड. पाटिल मॅडम , जोशी सर , मोहिते सर, कुणाल आंबेकर हे मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुता आडविलकर यांनी केले .