महाड : मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील केंबुर्ली गावच्या हद्दीत इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून रस्त्यावर काम करणारे दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
कोकणातून मुंबईच्या दिशेने निघालेली इर्टिगा कार केंबुर्ली गावच्या हद्दीत आली असता अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन आदळली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तसेच रस्त्यावर काम करणारे दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाड येथील ट्रॉम केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
