खेड : – तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील अॅक्वा फूड एक्झीम कंपनीतून अज्ञात चोरट्याने १० लाखाच्या साहित्याची चोरी करून पोबारा केला आहे. हि घटना २५ फेब्रुवारी दुपारी १ ते १४ मार्च २०२६ रोजी दुपारी २ या मुदतीत घडली आहे. या चोरीची फिर्याद धीरजलाल मंटूलाल बरूई (वय- ४१, सध्या रा. फ्लॅट नं. २०३, दुसरा मजला, ताम्हाणे हर्मनी पाग, ता. चिपळूण, मुळ रा. कोलकता ) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीतून डेन्मार्क देशातून विकत घेतलेले डॅनटेक फ्रिजोंग सिस्टीम, मशिनचे विविध पार्ट तसेच नामढुंग जॉईंट स्टॅक कंपनी या मशिनचे काही पार्ट सोबत दोन व तीन टन कष्टींग वॉशर अशा एकुण १० लाख रुपये किंमतीच्या आठ साहित्यांची चोरी करून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे.