चिपळूण : प्राथमिक आरोग्य केंद्र, अडरे यांच्या अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सती-चिंचघरी येथे ११ वा आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. यावर्षीची संकल्पना ‘निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद’ अशी आहे , कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यां मध्ये आयुर्वेदाबाबत जनजागृती करणे हा होता.
या कार्यक्रमामध्ये मा. वैद्ही रानडे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी,डॉ. अनिरुद्ध आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ज्योती यादव तालुका आरोग्य अधिकारी, एन.आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. चैतन्य खोत, वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री hफडके यांनी मार्गदर्शन केले. दिनचर्या, ऋतुचर्या, संतुलित आहार, योग, व्यायाम, तुळस, हळद, आवळा, आले यांचे महत्व सांगितले.
आरोग्य सहायीका श्रीम, उषा जाधव यांनी प्रतिज्ञा घेतली . गटप्रवर्तक श्रीम. श्रद्धा जाबरे यांनी आभार मानले. मुख्याध्यापकश्री. संजय वरेकर व , शिक्षकवृंद, आरोग्य सेवक श्री. निखिल वारके, श्री. शेखर बेडेकर, आशासेविका उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आयुर्वेदाच्या दिनयमेंविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास सुमारे १२० विद्यार्थी उपस्थित होते. औषधी वनस्पतीचे महत्व, घरगुती उपाय आरोग्यरक्षणासाठी आयुर्वेदाचे योगदान पाबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थी यांनी देखील औषधी वनस्पतींची माहिती जाणून घेऊन प्रश्न विचारले. आयुर्वेद हा आपल्या संस्कृती वारसा असून ते देनंदिन जीवनात अंगीकृत असे आवाहन डॉ. ज्योती यादव तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले.
आयुर्वेद दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांना तुळस, हळद, आवळा या वनस्पतींचे गुणधर्म समजावून सांगण्यात आले . आरोग्यसंबंधी शंकांचे निरसन करून निरोगी जीवनासाठी आयुर्वेदीय दिनचर्या अंगीकारण्याचा सल्ला देण्यात आला. शालेय स्तरापासूनच आयुर्वेदाविषयी जागृती होणे काळाची गरज असल्याचे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
“सेवा संकल्प अभियान “17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर अंतर्गत ११ वा आयुर्वेद दिन तालुका चिपळूण येथे उत्साहात साजरा…
