कर्जत ( संजय गायकवाड ) : मराठी नववर्षाच्या स्वागताचा सण म्हणजे गुढीपाडव्या निमित्त कर्जत मधील अनेक संस्था एकत्र येऊन कर्जत शहरात मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बहुतांश गावात गुढ्या उभारून गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या वतीने कडुलिंबाच्या रोपांचे वाटप करून ‘गुढी पाडवा कढीनिंब वाढवा’ हा संदेश देण्यात आला.
कपालेश्वर देवस्थान समिती, सार्वजनिक गणेशोत्सव समिती, विश्वहिंदू परिषद, बजरंग दल, प्रजापती ब्राह्मकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय, शिवतांडव प्रतिष्ठान ढोल ताशा पथक आदींनी एकत्र येऊन स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. टिळक चौकातून या स्वागतयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.या शोभायात्रेत उपगराध्यक्ष संतोष पाटील, नगरसेवक राजाभाऊ कोठारी, महेंद्र चंदन, प्रशांत पाटील, वैभव सुरावकर, रोहित ओसवाल माजी नगरसेवक सुनील गोगटे, सुरेखा शितोळे, साईनाथ श्रीखंडे, दिनेश कडू, अभिजीत मराठे, दिलीप गडकरी, पद्माकर गांगल, महेंद्र बोडके, मधुकर घरत, मैत्र जिवजी, दिनेश रणदिवे, सुनील सोहनी, अमोल देशमुख, स्नेहा गोगटे, ज्योती कडू, ऍड. अभिषेक तिवारी, सर्वेश गोगटे, परेश शहा, मिलिंद खंडागळे, स्वराली गोगटे आदी कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही स्वागत यात्रा कर्जत शहरातील मुख्य बाजार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटील आळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पुन्हा टिळक चौकात आली आणि श्री कपालेश्वर मंदिरात सामुदायिक आरती करून सांगता करण्यात आली. या स्वागत यात्रेत ढोल पथकांनी उपस्थितांचे मन जिंकले. विशेषतः युवतींनी ढोल वाजवून आपली चमक दाखवून दिली. गावा गावात घरो घरी गुढ्या उभारून नव वर्षाचे स्वागत करण्यात आले.
‘गुढी पाडवा कडूनिंब वाढवा’
गुढी पाडव्याचे औचित्य साधून अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला राष्ट्रीय हरित सेना आणि सामाजिक वनीकरण विभाग रायगड अलिबाग परिक्षेत्र कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गुढी पाडवा कडूनिंब वाढवा’ या पर्यावरण पोषक उपक्रमाच्या माध्यमातून कडूनिंबाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार पद्माकर गांगल, हरित सेना शिक्षक संजय देसले, रेंज फॉरेस्ट ऑफिसर मिलिंद राऊत, मुख्याध्यापक सात्विक बोरसे, माजी मुख्याध्यापक अनिल गलगले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दुसाने, मंगल गायकवाड, दया हजारे, अर्चना जोगळेकर, बळीराम डोंगरे, अर्जुन आंधळे आदींसह हरित सेनेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.
नववर्षाच्या स्वागतासाठी कर्जत मध्ये स्वागतयात्रा…
