पेण (प्रशांत पोतदार) : भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन राज्यसभा खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने नगरसेविका सौ. पल्लवी प्रसाद कालेकर यांच्या माध्यमातून डॉ. जी.डी.पोळ फाउंडेशन (वाय.एम.टी. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व रुग्णालय, खार-नवी मुंबई) यांच्या सहकार्याने कन्या शाळा,प्रभु आळी पेण येथे रविवार २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन विशेष आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात येत आहे तर सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिबिरात पोटाचे आजार अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल, मुळव्याध, भगंदर, फिशर. त्वचा विकार, पांढरे डाग, सोरायसिस, ईसब, सौंदर्यविषयक समस्या.स्त्रियांचे आजार, वंध्यत्व, पाळीचे आजार.उच्च रक्तदाब,मधुमेह, मानसिक तणाव,निद्रानाश.सांधेदुखी, मणक्याचे आजार, वाताचे आजार, स्नायूविकार. जुनाट सर्दी,दमा,श्वसनाचे आजार. तसेच नेत्र तपासणी,बाल आरोग्य तपासणी, डॉ. केसकर पॅथॉलॉजी तर्फे रक्त तपासणी सुविधा तसेच सर्व नागरिकांसाठी उपलब्धत औषध वाटप करण्यात येणार आहे.अहना राजेंद्र पाटील व प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका पल्लवी प्रसाद कालेकर यांच्या कडून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
