शिरगाव चिपळूण : तालुक्यातील पोफळी येथे रविवार दिनांक 22 मार्च रोजी आई महाकाली देवीचा छबिना साजरा होत असून विद्युत् रोषणाई खास आकर्षण ठरणार आहे. हत्ती आणि शार्पी लाईट खास आकर्षण ठरणार आहे..
शिरगाव कुंभार्ली पोफळी तीन गावचे जागृत देवस्थान आई महाकाली देवीचा छबिना महिनाभर सुरू असतो त्यात पोफळी येथील आई महाकाली देवीचा छबिना महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध आहे रविवार दिनांक 22 मार्च रोजी आई महाकाली देवीचा छबिन्यास रात्री 11 वाजता सुरू होईल यावेळी पोफळी नाक्यावर पालखी नाचविण्यात येईल.यावेळी पंचक्रोशीतील ढोल ताशे , अंबारी,आकर्षक विद्युत रोषणाई व गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी छबिण्यात करण्यात येईल.
तरी आई महाकाली देवीच्या छबिण्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पोफळी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.