चिपळूण : अनारी गावची ग्रामदेवता केदारनाथ, थोरली काळकाई, धाकटी काळकाई, सुकाईदेवी, वरदायीनी देवी या मंदिराच्या १८ एकर परिसरात स्थानिक प्रजाती चे तसेच फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पवार, पुणे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पवार गावचे सरपंच सदानंद पवार, पुजारी सिताराम कदम, विजय कदम .

मुंबई व पुण्यातील ग्रामस्थ व गावातील स्थानिक ग्रामस्थ, प्राथमिक शाळेतील शिक्षक किशोर मोहिते व विद्यार्थी या वृक्षारोपणासाठी एकत्र येतात. चिपळूणमधील अनेक संस्थाना ते निमंत्रण देतात. व येताना स्थानिक प्रजातीची झाडे घेवून या व लागवड करूया असेही आवाहन करतात. या आवाहनाला पेढे चिपळूण मधील निसर्गप्रेमी विलास महाडीक यांनी ३ वर्षाची बहावा, पिंपळ, अर्जुन अशी ५ पिशवीतील झाडे देवस्थानच्या आवारात मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ व आलेल्या मान्यवरांच्या हस्ते रोपण करण्यात आली. गेली आठ वर्षे हा त्यांचा उपक्रम चालूआहे. अनेक संस्था या कार्यक्रमात सहभागी होतात. अॅक्टीव ग्रुपचे कैसरभाई देसाई हे ही या उपक्रमात दरवर्षी सहभागी होतात. या कार्यक्रमात वृक्षलागवडीसाठी सहभागी मानवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून मंदिरामध्ये सत्कार करतात.