खेड : – तालुक्यातील खवटी ग्रामपंचायत हद्दीतील पाखरवाडी येथे जल महोत्सवाच्या अनुषंगाने ८ मार्चपासून सुरू झालेला जल अर्पण दिवस हस्तांतरण प्रक्रिया महोत्सव सोमवारी १६ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाची सांगता येत्या रविवारी २२ मार्च रोजी होणार आहे.
या महोत्सवात येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे कनिष्ठ अभियंता सिद्धांत घुगे यांनी देखभाल दुरूस्ती बाबत व जल अर्पण बाबतचे महत्त्व तसेच योजनेची सविस्तर माहिती सर्वांसमोर विशद केली. वातावरण निर्मितीसाठी शालेय विद्यार्थी यांची प्रभात फेरी काढण्यात आली. रांगोळी काढण्यात आली होती तसेच बॅनर , स्त्रोतांवर एफटीके किट प्रात्यक्षिक हे पाच भगिनींमार्फत करण्यात आले. नळाचे पूजन ,जल पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करत असताना जल प्रतिज्ञा घेण्यात आली. या महोत्सवाला पंचायत समितीच्या सभापती डॅा . आफिया पालेकर,उपसभापती सुनिल मोरे,जि. प. सदस्या मानसी जगदाळे, पंचायत समिती सदस्या नम्रता तांबट, निसार सुर्वे, दिलीप डेरवणकर , गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, कनिष्ठ अभियंता सिद्धांत घुगे व विजय पाटील, विस्तार अधिकारी श्री. देसाई, गट संसाधन केंद्रातील कर्मचारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी प्रविण क्षिरसागर तसेच गा्वस्तरांवरील सरपंच ,उपसरपंच ,पोलीस पाटील,अंगणवाडी सेविका व महीला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते .