खेड :- तालुक्यातील तिसे येथे दगडाने मारहाण करून शिवीगाळी करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दोघां संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना १९ मार्च रोजी सायंकाळी ३:४२ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार , तालुक्यातील तिसे गावातील मुस्लिम मोहल्ल्यात ॲड. नवाबखान अहमद तिसेकर (वय ५५) यांनी पाळलेली व मालकीचे कोंबडी व हंस दुपारच्या वेळी ओरडतात, त्यामुळे आमची झोपमोड होत आहे याचा राग मनात धरून संशयीत आरोपी असिफ अली तिसेकर व जहीर अली तिसेकर हे दोघेजण घरासमोर शिविगाळ करीत होते. शिविगाळ कोण करत आहेत. हे पाहण्यासाठी घराचा दरवाजा उघडून पहात असताना, संशयीत आरोपी आसिफ याने हातात दगड घेऊन फिर्यादी ॲड. तिसेकर यांच्या दिशेने मारला असता, तो दगड त्यांच्या उजव्या हाताच्या खांद्याला लागला. व शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी असिफ अली तिसेकर व जहीर अली तिसेकर (दोन्ही रा. तिसे, ता. खेड, जि. रत्नागिरी ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.