खेड : – येथील लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या अध्यक्षपदी ला. अविनाश दळवी यांची सन २०२६-२७ या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरील तालुक्यातील उधळे येथील ” मँगो ट्रिट ” या हॉटेलमध्ये शुक्रवार दि. १७ एप्रिल २०२६ रोजी रात्रौ पदाधिका-यांच्या पार पडलेल्या विशेष बैठकीत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सन २०२६-२७ साठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
सर्वांनुमते पार पडलेल्या या बैठकीत अध्यक्षपदी ला. अविनाश दळवी यांच्यासह सेक्रेटरीपदी ला.उत्तम कांबळे, खजिनदारपदी ला.संदीप मोरे तर उपाध्यक्षपदी ला. सागर करवा यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिवर्षी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात येत असल्याने क्लबच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांना अधिक गती मिळत आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. लायन्स ऑफ खेड सिटीने समाजोपयोगी उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नव्या नेतृत्वाखाली या कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.