खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यातील चाकाळे येथील महालक्ष्मी मंदिरात ” माझं गाव आरोग्य संपन्न गाव ” या अभियानांतर्गत ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

देवा ग्रुप फाउंडेशन, आरोग्य विभाग, जिल्हा क्षयरोग केंद्र, जिल्हा आरोग्य कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे आणि अष्टविनायक हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास १८७ लाभार्थी ग्रामस्थांनी भेट दिली त्यापैकी ११४ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.,तर ४ गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात आले.
या शिबिरात आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, आधार कार्ड व रेशन कार्ड पडताळणीच्या आधारे मोफत उपचार व आवश्यक शस्त्रक्रियाही करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. चाकाळे ग्रामस्थ मंडळाने या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.