खेड : आपल्या हिंदू संस्कृती.परंपरा आणि सनातन धर्माच्या संवर्धनासाठी करीत असलेल्या अमूल्य आणि अविरत सेवेचा गौरव करण्या साठी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने संदीप नारायण सासने यांना अत्यंत आदराने आणि अभिमानाने शाल श्रीफळ “धर्मपालक” गौरव पुरस्कार पत्र व मराठा साम्राज्याची मराठा मूठ तलवार प्रदान करण्यात आले
श्री संदीप सासने यांनी गेली ३५ वर्ष किल्ले रसाळगड येथील शिव जयंती उत्सव अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी केलेला त्याग तसेच खेड शहरात शिवतर रोड येथे शिमगा उत्सव, दहीहंडी उत्सव, गणेश उत्सव, नवरात्रोत्सव सुरू केलेत त्याच बरोबर खेड शहरात श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर स्थापन करून नाना विविध धार्मिक कार्यक्रम. महाप्रसाद.पालखी सोहळा.त्याच बरोबर तालुक्यातील गड किल्ले यांची महती “आम्ही इतिहासाचे साक्षीदार” या अंकाद्वारे तर “ब्रम्हांड नायक” अंकाद्वारे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिराची माहिती प्रसिध्द करून सकल हिंदू समाजा चे लक्ष वेधून घेतले. संदीप सासने हे गेली ४ वर्ष खेड ते अक्कलकोट धर्म ध्वज घेऊन पाई वारी करीत आहेत.येणाऱ्या पिढ्यान् साठी हे प्रेरणा दाई असून त्यांच्या या पवित्र आणि समर्पित कार्या मूळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे असे प्रतिपादन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान चे अध्यक्ष श्री प्रशांत सावंत यांनी केले यावेळी उपस्थित शहर कार्याध्यक्ष श्री विनय माळी, ॲड.श्री अमेय मालशे, श्री विलास भुवड, श्री रोहन केळकर, दुर्गेश शिगवण, श्री दीपक धनावडे, राज माने, हर्ष भोसले, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ सचिव श्री उल्हास शेलार, श्री मंगेश पवार, श्री राधेश्याम वर्मा, उदय पाटणे शेट्ये, श्री हरिश्चंद्र खेडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते संदीप सासने यांना धर्मपालक पुरस्कार प्राप्त…
