चिपळूण : चिपळूण शहरातील वानी आळी येथील राम मंदिर सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आमदार शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. राज्य शासनाच्या विशेष नागरी सुविधा योजनेंतर्गत या सभागृहासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार शेखरजी निकम यांनी नागरिकांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
राम मंदिर सभागृहाची आवश्यकता लक्षात घेऊन या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे परिसरातील धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नागरिकांना हक्काचे सभागृह उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार शेखरजी निकम यांची वचनपूर्ती!
वानी आळी परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन सभागृहाच्या कामासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल नगरसेवक निहार कोवळे यांनी आमदार शेखरजी निकम यांचे आभार मानले. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमदारांनी घेतलेला पुढाकार आणि दिलेल्या शब्दाची केलेली पूर्तता यामुळे या विकासकामाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची विशेष उपस्थिती होती. शहरातील आवश्यक नागरी सुविधा बळकट करण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देण्यासाठी अशा विकासकामांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. राम मंदिर सभागृहाच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना धार्मिक, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती…
यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, नगरसेवक निहार कोवळे, नसरीन खडस, शशी मोदी, दादा खेडेकर, शैलेश टाकले, नीता साडविलकर, बिलाल पालकर, नयन साडविलकर, सुनील खेडेकर, संजय साडविलकर, दादू गूढेकर, श्रीकृष्ण खेडेकर, समीर काझी, रुही खेडेकर, मयूर कोळवणकर, सचिन साडविलकर, राजा खातू, प्रथमेश डाकवे आदी मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांची मागणी, आमदारांचा सकारात्मक प्रतिसाद आणि विकासकामातून झालेली वचनपूर्ती, यामुळे वानी आळी येथील राम मंदिर सभागृहाचा भूमिपूजन सोहळा परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरला.
