दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या विश्वेश्वरय्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महा कुंभाच्या निमित्ताने सदर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण कोकण व नाशिक विभागात याच दिवशी एकूण ४१८ रोजगार मिळावे आयोजित करण्यात आले असून या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणाली द्वारे होणार आहे. या मेळाव्यामध्ये दापोलीतील आणि दापोली बाहेरील एकूण २७ कंपन्या अथवा संस्था सहभागी होणार असून तालुक्यातील अनेक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत. दापोलीतील मेळाव्यामध्ये ७८ पदासाठी मुलाखती होणार आहेत. तरी या संधीचा फायदा जास्तीत जास्त योग युवतीने घ्यावा असे आवाहन विद्यापीठाच्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.