खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संचलित ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाने अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्कृष्ट निकालांच्या जोरावर संपूर्ण कोकणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून कार्यरत असलेल्या या महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट संस्कारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी मार्गदर्शन केले जात आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबतच राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

GPAT परीक्षेत विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश

महाविद्यालयाचे आठ विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात GPAT परीक्षेत पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना ‘प्रधानमंत्री स्कॉलरशिप फॉर फार्मसी पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज’ (PMSPPS) अंतर्गत प्रत्येकी सुमारे ₹३,००,०००/- शिष्यवृत्तीचा लाभ मिळत आहे.

GATE परीक्षेतही उल्लेखनीय कामगिरी

महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी GATE परीक्षेत उच्च गुणांसह उत्तीर्ण झाले असून, त्यांनी ICT मुंबई (Institute of Chemical Technology) आणि NFSU अहमदाबाद (National Forensic Sciences University, Gujarat) यांसारख्या देशातील नामांकित संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. त्यांना सुमारे ₹३,००,०००/- शिष्यवृत्तीचा लाभ मिळत आहे.

अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी शिक्षकवृंद

महाविद्यालयात प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध असून, संशोधनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले आहे. विद्यापीठीय तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अद्ययावत संदर्भग्रंथ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स उपलब्ध असून, विद्यार्थ्यांसाठी रात्री ८ वाजेपर्यंत अभ्यासिका (Reading Room) सुविधा उपलब्ध आहे. तसेच GPAT, GATE, NIPER यांसारख्या स्पर्धा परीक्षांसह औषधनिर्माण कंपन्यांमधील रोजगाराच्या संधींसाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते.

शिष्यवृत्ती व विविध शैक्षणिक सवलतींची सुविधा

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सर्व प्रवर्गांतील मुलींना ट्युशन फीमध्ये १०० टक्के सवलतीचा लाभ मिळू शकतो. तसेच SC, ST, VJNT, OBC, SBC, EWS आणि EBC प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या नियमानुसार शिष्यवृत्तीच्या सुविधा उपलब्ध आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसह पात्र विद्यार्थ्यांसाठी शासकीय निर्वाह भत्ता योजनांचाही लाभ उपलब्ध आहे.

CAP Round 2 आणि Round 3 चे वेळापत्रक जाहीर

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी CAP Round 2 चा Option Form २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत, तर CAP Round 3 चा Option Form १० ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भरता येणार आहे.

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रात प्रवेश घेताना ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचा प्राधान्यक्रम निवडून शासनाच्या उपलब्ध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा आणि आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित नगरे यांनी केले आहे.

उपलब्ध संधींचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी विहित वेळेत ऑप्शन फॉर्म भरून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानदीप परिवारात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी आणि सचिव श्री. माधव पेठे यांनी केले आहे.

महाविद्यालयाचा पत्ता :
ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, बोराड, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी.

प्रवेश मार्गदर्शन व अधिक माहितीसाठी संपर्क :
प्राचार्य : ७९७२११२१९२
ॲडमिन : ९५६११२९६६२
कॉलेज : ९३०७३७७४०८