चिपळूण – येथे उपरोक्त संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जलजागृती स्पर्धा कार्यक्रम नुकताच यशस्वीपणे पार पडला.
२० मार्च जागतिक जलदिन व जल जागृती सप्ताहाचे औचित्य साधून ‘पाणी’ या विषयाबाबत समाज जागृती निर्माण करणे व सहभाग वृध्दी निर्माण करणे या हेतूनी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धा सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळच्या प्रसन्न आल्हाददायी वातावरणात निसर्गरम्य रामतीर्थ तलाव परिसर, चिपळूण येथे सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला.
ह्यामध्ये चिपळूण शहर व परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. तसेच त्यांचे शिक्षकवृंद, पालक, जल व निसर्गप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील विशेष मान्यवर उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
या स्पर्धेतील विविध गटांनुसार क्रमांकनिहाय विजेते याप्रमाणे –
१) रंगभरण स्पर्धा ->
प्रथम- गणेश टारपे,
द्वितीय- सांची जाधव,
तृतीय- आराध्य निवळकर,
उत्तेजनार्थ- संस्कृती साळुंके

२) चित्रकला स्पर्धा ->
प्रथम- थोरवी शेटये,
द्वितीय- स्पृहा कलवारी,
तृतीय- मनस्वी मते,
उत्तेजनार्थ-
राशी रहाटे,
उत्स्फूर्त उत्तेजनार्थ- आस्था भालेकर

वक्तृत्व स्पर्धा ->
पहिला गट :
प्रथम- ओवी भावे,
द्वितीय- साफुरा खतिब,
तृतीय- सान्वी खोत,
उत्तेजनार्थ- हसीबा बोट
दुसरा गट :
प्रथम- स्वराज कदम,
द्वितीय- अब्दुल्ला तांबे,
तृतीय- वेदांत महाडीक,
उत्तेजनार्थ- निधी कदम .

विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तिपत्रक रोख रक्कम व वनस्पतीचे रोप प्रदान करून गौरविण्यात आले.

प्रसिद्ध चित्र व शिल्प कलावंत संतोष केतकर, संजय कारेकर, सतीश कदम तसेच वक्तृत्वपटू योगेश पेढांबकर, मुजाहिद मेयर, ऍड सुमय्या मेयर हे या विविध स्पर्धांकरिता परीक्षक म्हणून लाभले.
तसेच श्री दीपक सीताराम यादव केंद्र प्रमुख खेर्डी आणि श्री अ रऊफ गुलमोहिद्दीन सुर्वे गोवळकोट यांचे देखील विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या निसर्गमंचावर विविध विशेष मान्यवर आसनस्थ होते.
श्री. विपुलजी खोत
उपविभागीय (अभियंता जलसंपदा विभाग रत्नागिरी),
श्री. सूर्यकांतजी खतेले (सभापती- चिपळूण पंचायत समिती),
श्री. संदेशजी आयरे उपसभापती- (चिपळूण पंचायत समिती),
श्री.दादासाहेब इरनाक (गट शिक्षणाधिकारी)
पंचायत समिती विस्तार अधिकारी शिंदे मॅडम चिपळूण,
श्री. उमेशजी सकपाळ (नगराध्यक्ष- चिपळूण नगर परिषद),
सौ. रूपालीजी दांडेकर (उपनगराध्यक्षा- चिपळूण नगर परिषद),
ज्येष्ठ पत्रकार व नवनियुक्त जलदूत श्री. सतीशजी कदम
आदी मान्यवर निसर्गमंचावर विराजमान झाले होते.
या भरघोस प्रतिसाद लाभलेल्या कार्यक्रमाचे आयोजन-संयोजन अर्थ फाऊंडेशन चिपळूण ह्या स्वयंसेवी संस्थेतर्फे केले होते. या परिश्रमपूर्वक यशस्वी कार्यक्रमाबाबत अनेकांतर्फे कौतुक करण्यात येत आहे.