खेड : – तालुक्यातील औदुंबर श्रीदत्त देवस्थान मठ, सुकिवली येथे चैत्र शुध्द नवमी गुरुवार दि. २६ मार्च २०२६ रोजी वै.ह.भ.प. काशिनाथ नारायण चाळके यांच्या कृपाशिर्वादाने आणि गुरुवर्य योगिराज प. पू. परमाब्धीकार परमात्मराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहोळ्यामध्ये प्रभू श्रीराम यांना अभिषेक, अन्नदान सेवा, प्रवचन सेवा, हरिपाठ, भजन सेवा होईल.मागील १८ वर्षाची परंपरा लाभलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्तरोत्तर भाविक भक्तांसाठी नवी पर्वणी ठरला आहे. आजवर अनेक श्रीराम भक्तांनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शविली आहे. नामसंकिर्तनाच्या माध्यमातुन आपल्या सारख्या बहुतांश श्रीराम भक्तांच्या अमृतवाणीतून जन्मोत्सव सोहळ्याची महत्तता अधिकच वाढली आहे. यावर्षी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे हे १९ वे वर्ष आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ – श्रीराम मुर्तीला अभिषेक., सकाळी १० – श्रीसत्यनारायणाची महापुजा व आरती., सकाळी ११ – नामस्मरण कार्यक्रम., दुपारी १२ – श्रीराम जन्मोत्सव सोहळा,महाआरती, नामस्मरण व प्रसाद वाटप., दुपारी १ – महाप्रसाद., दुपारी ३ ते ५ – श्रीरामविजय ग्रंथाचे पठण., सायंकाळी ६ ते ७ – हरिपाठ व भजन सेवा., रात्रौ ८ ते ९ – प्रवचन सेवा., रात्रौ १० नंतर हरिजागर अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. तरी या सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहून नामसंकीर्तनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन संस्थापक औदुंबर श्रीदत्त देवस्थान व श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे ह.भ.प.श्री.श्रीकांत चाळके., ह.भ.प. सौ.स्वाती श्रीकांत चाळके आणि समस्त चाळके परिवार आणि व्यवस्थापक सुकीवली ग्रामस्थ मंडळ व श्रीदत्त प्रासादिक भजन मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.