विलेपार्ले : विलेपार्ले येथील संकटमोचन श्री हनुमान मंदिर सेवा मंडळ आणि सेव्हनहिल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, दिनांक ३ एप्रिल २०२६, शुक्रवार, सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार आहे.
स्थळ : हनुमान नगर, कुर्ले चाळ, श्रद्धानंद रोड, सर्व्हिस रोडच्या बाजूला, विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ५७. मंडळाचे अध्यक्ष विजय बाईत यांनी नागरिकांना या विनामूल्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या शिबिरात विविध प्रकारच्या खर्चिक आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी योग्य मार्गदर्शन आणि सल्ला दिला जाणार आहे. यामध्ये अँजिओग्राफी, बायपास शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, हिप व गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया, मोफत अँजिओप्लास्टी, मेंदूतील शस्त्रक्रिया, थायरॉइड एब्लेशन, केमोथेरपी, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, व्हॉल्व शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, व्हेरिकोज व्हेन्स उपचार, रेडिएशन थेरपी आणि सर्वसामान्य शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.
विशेष सुविधा : मेडिकल पॉलिसी अंतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात उपचार, अनुभवी डॉक्टरांचा सल्ला, जनरल आरोग्य तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, ईसीजी, SPO2 तपासणी, मोफत डोळ्यांची चाचणी आणि कमी किमतीत चष्मा वितरण होणार आहे.
आजारांच्या बाबतीत वैद्यकीय उपचारासाठी शिबिराचा लाभ घेण्यासाठी पिवळे / केशरी / पांढरे रेशन कार्ड आणि आधार कार्ड (महाराष्ट्र राज्य) आवश्यक आहे.