मुंबई : वंचित बहुजन आघाडी प्रणित विद्यार्थी संघटना ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’च्या वतीने NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला.

पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड करत अनेकांना अटक केली. तसेच, अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणाविरोधात आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे.