नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांत जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच Artificial Intelligence हा सर्वात चर्चेचा विषय ठरला. एआयमुळे नोकऱ्या जाणार, बेरोजगारी वाढणार, कंपन्यांची कामकाज पद्धती बदलणार अशा चर्चा सतत होत होत्या. पण आता या चर्चेला एक मोठा ट्विस्ट मिळाला आहे.

एआयचा खर्च आणि संकटगुगल, मायक्रोसॉफ्ट, उबरपासून ते अगदी OpenAI पर्यंत सर्व कंपन्यांनी एआय महाग ठरत असल्याची कबुली दिली आहे. मायक्रोसॉफ्टने Claude चे परवाने रद्द केले, तर एका कंपनीला काही महिन्यांतच ८०० मिलियन डॉलरचं एआय बिल आलं. स्टार्टअप्सचं एआय सबस्क्रिप्शन बजेट वेळेपूर्वीच संपलं.

इतिहासाची पुनरावृत्ती?१९९० च्या दशकात इंटरनेटबद्दलही अशीच हवा होती. प्रत्येक कंपनी स्वतःला इंटरनेट कंपनी म्हणवत होती, गुंतवणूकदार प्रश्न न करता पैसे गुंतवत होते. पण १० मार्च २००० रोजी Dot-com bubble फुटला आणि हजारो कंपन्या संपल्या. आज एआयबद्दलही तसंच वातावरण दिसत आहे.?? एआयचा बुडबुडा फुटणार?२६ वर्षांपूर्वी डॉट कॉमबद्दल असलेली अस्वस्था आणि आता एआयबद्दल असलेली स्थिती यात साम्य आहे. एआयवर होणारा खर्च ही सर्वात मोठी अडचण ठरत आहे. लोकांनी ChatGPT, Gemini सारख्या साधनांचा वापर केला, पण यामागे लागणाऱ्या खर्चाबद्दल फारशी चर्चा झालेली नाही.