चिपळूण : ग्रॅव्हिटी योजनेअंतर्गत नव्याने टाकण्यात आलेली पाईपलाईन बहादूर शेख ते चिंच नाका या मुख्य जलवाहिनीला (मेन लाईन) जोडण्याचे काम काल रात्री १२ वाजल्यापासून हाती घेण्यात आले होते. परंतु मुख्य जलवाहिनी ४० वर्षे जुनी असल्याने जोडणी करताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अद्यापही काम युद्धपातळीवर सुरू आहे. संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
ग्रॅव्हिटी योजनेअंतर्गत पाईपलाईन जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू
