चिपळूण : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाग मुलांची या शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आज सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी चिपळून नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी तथा पाग मुलांच्या शाळेचे माजी विद्यार्थी सन्माननीय प्रमोद ठसाळे साहेब तसेच पाग मुलांच्या शाळेवर विशेष प्रेम असणारे माजी विद्यार्थी सन्माननीय सुयोग चव्हाण सर यांचे सोबत शाळेचे अनेक माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले या सर्वांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री नरेश मोरे सर यांनी पुष्प देऊन केले.
शाळेचे माजी विद्यार्थी श्री जगदीश गोरीवले यांचा आज वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्त शाळेच्या सर्व शिक्षकांसह माजी विद्यार्थी मित्रांनी त्यांना विशेष अभिष्टचिंतन केले.
यानंतर माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेबाबत श्री मोरे सरांनी सर्व सभेला शासनाच्या जीआर ची सविस्तर माहिती दिली त्यानुसार पागेतील तरुण तडफदार श्री संदेश विजय किंजळकर यांची सर्वानुमते अध्यक्ष या पदासाठी निवड करण्यात आली, तसेच उपाध्यक्ष म्हणून श्री विनायक वसंत सावंत , सचिव शाळेचे मुख्याध्यापक श्री नरेश सदाशिव मोरे आणि ही सभा यशस्वी करण्यासाठी ज्याने प्रयत्न केले ते श्री स्वप्निल संजय नाचणकर यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
शाळेची माजी विद्यार्थी संघटना कार्यकारणी खालील प्रमाणे
अध्यक्ष -श्री संदेश विजय किंजळकर ( शाळेचा माजी विद्यार्थी ) , उपाध्यक्ष -श्री विनायक वसंत सावंत ( शाळेचा माजी विद्यार्थी ) , सचिव श्री नरेश सदाशिव मोरे सर( शाळेचे मुख्याध्यापक ) , कोषाध्यक्ष (खजिनदार)- श्री स्वप्निल संजय नाचणकर ( शाळेचा माजी विद्यार्थी ) , सल्लागार -श्री महादेव विठ्ठल चिले , सल्लागार – श्री सुयोग शंकर चव्हाण . मार्गदर्शक- श्री प्रमोद शंकर ठसाळे सदस्य – श्री संदेश श्रीकांत गोरीवले , श्री गणेश लक्ष्मण किंजळकर , श्री संदीप सुभाष बोंडकर , श्री नयन राजेंद्र चव्हाण,श्री महेश महादेव कांबळी ,सौ स्नेहल संजय नाचणकर
