चिपळूण – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चिपळूण येथील रंजिता चॅरिटेबल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती रंजिता विजय ओतारी यांना भारत निर्माण योगदान अवॉर्ड २०२६ ऑल इंडिया बेस्ट सोशल वर्कर महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पणजी-गोवा येथे २६ सप्टेंबर २०२६ रोजी आपला वैभव फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि आमदार डिलायला लोबो यांच्या हस्ते रंजिता ओतारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रंजिता चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाला त्यांच्या टीमसह कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, शिक्षक, पालक, विद्यार्थी, तसेच मित्र-मैत्रिणी आणि समाजातील विविध घटकांचे सहकार्य लाभत आहे.
या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.पुरस्कार मिळाल्याने सामाजिक कार्याची नवी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले असून यापुढे अधिक जोमाने सामाजिक कार्य करण्याची जबाबदारी वाढली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या सन्मानासाठी आपला वैभव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वैभव विरकर यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
