खेड : – शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.ए. केजी ॲण्ड प्रायमरी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संस्थाध्यक्ष ए.आर.डी. खतीब यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुण्या चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, रत्नागिरी जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम महिला आघाडीच्या अध्यक्षा सईदा शेखदारे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
यावेळी अनवर परकार, अहमद कौचाली, मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर उपस्थित होत्या. यावेळी वर्षभरात उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
खेडमधील एम.आय.ए.केजी ॲण्ड प्रायमरी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा !
