लांजा: तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमधील २४ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २८ एप्रिल रोजी मतदान तर २९ एप्रिल रोजी निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
लांजा तालुक्यात एकूण १३ ग्रामपंचायतीमधील २४ पदे रिक्त आहेत. यामध्ये भडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पद आणि सदस्यांसह उर्वरित २३ ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त आहेत. दरम्यान, पोटनिवडणूक होणाऱ्या तेरा ग्रामपंचायतींमध्ये भडे, कुरचुंब ,वाघ्रट,वेरळ, बेनी बुद्रुक, शिरवली, आगवे, खावडी, कोचरी, कोट, पुनस, कोर्ले, वेरवली खुर्द या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या पोटनिवडणूकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमांतर्गत ७ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत असून इच्छुक उमेदवारांनी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आपली नामनिर्देशन पत्रे सादर करायची आहेत. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची (उमेदवारी अर्ज) छाननी १५ एप्रिल रोजी होणार असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख ही १७ एप्रिल आहे. या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
तर १७ एप्रिल रोजी निवडणूक चिन्ह देणे तसेच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २८ एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सकाळी ७.३० ते सांयकाळी ५.३० वाजे पर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच २९ एप्रिल रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात