चिपळूण : भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष तसेच पंचायत समिती सदस्य श्री विनोद जयवंत भुरण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित खेर्डी औद्योगिक वसाहत गणेश विसर्जन घाट येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यावेळी जिल्हा उपाध्यक्षा सौ.स्नेहा मेस्त्री, ग्रामपंचायत माजी सरपंच सौ.वृंदा दाते , माजी ग्रामपंचायत सदस्य खेर्डीचे शक्तीकेंद्र प्रमुख श्री.विनय दाते, संकेत चिले,सौ.विभावरी जाधव, आरती धामणस्कर, बूथ अध्यक्ष मंगेश चिले, राकेश भुरण, संजय शिगवण,जगदीश वाघुळदे , सतीश पंडित, श्रीधर भुरण,सिद्धेश चिले, प्रसाद वरेकर, सार्थक दाते,आदि उपस्थित होते.