पुणे : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

AI च्या माध्यमातून तयार होणारे पोस्टर्स आणि बॅनर्स मोठ्या प्रमाणावर वापरले जात असून, हा प्रकार चळवळीच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.बाबासाहेबांचे खरे विचार आणि मूळ स्वरूप जपण्यासाठी सर्वांनी त्यांच्या ओरिजिनल फोटोंचाच वापर करावा आणि भीम जयंती उत्साहात साजरी करावी, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले आहे.