मंडणगड : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, रत्नागिरी तसेच श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ आणि मातोश्री हॉस्पिटल, मंडणगड व प्राथमिक आरोग्य केंद्र, मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी आंबडवे, मंडणगड येथे आयोजित करण्यात आले आहे.

वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी २.०० , शिबिरामध्ये खालील तपासण्या व सुविधा उपलब्ध असतील : तज्ञ डॉक्टरांची तपासणी व मार्गदर्शन , रक्तदाब तपासणी , रक्तातील साखर (मधुमेह तपासणी) , वजन तपासणी , स्त्रीरोग तपासणी (महिलांसाठी) , हाडांची तपासणी , ईसीजी तपासणी , औषधे वितरण , अस्थमा (दमा) तपासणी , आहाराबाबत मार्गदर्शन , कान, नाक व घसा तपासणी , डोळ्यांची तपासणी ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

मा. श्री उदयजी सामंत साहेब ,पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा ,तसेच उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य ,मा. श्री योगेशदादा कदम साहेब गृहराज्यमंत्री व महसूल राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मा. डॉ. भास्कर जगताप जिल्हा शल्यचिकित्सक मा. श्री बाळासाहेब सोळंकी प्रादेशिक उपआयुक्त, समाजकल्याण, मुंबई विभाग ,श्री दीपक घाटे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, रत्नागिरी योगेश पाटील संस्था प्रतिनिधी श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ डॉ. प्रदीप मुळे
मातोश्री हॉस्पिटल, मंडणगड श्री शशिकांत चव्हाण संपर्कप्रमुख : ९६०४०२०६३८