रोहा : चणेरा-बिरवाडी-पांगलोळी- उसर मार्गे रोहा या राज्य मार्गाचे काम गेली ५ वर्षापासून प्रलंबीत असल्याने १४ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या सुस्त कारभारा विरोधात जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको नंतर जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला होता.मात्र या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रोहा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुजय कुमार सिंहा यांची सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, वन विभागातील अधिकारी आणि आंदोलक यांची संयुक्त बैठक घेत शांततेचे आवाहन केले.व वन विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने ना हरकत दाखला द्यावे तर दाखला मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रलंबीत रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे अशी विनंती वजा मागणी केली. तसेच नागरिकांनी कायदा हातात न सनदशीर मार्गाने लढाई लढावी अशी विनंती केली.पोलिसांच्या विनंती मान देत चणेरा ग्रामस्थांनी १४ एप्रिलच्या आंदोलनाला स्थगिती दिली.
चणेरा ग्रामस्थांच्या जेल भरो आंदोलनाला स्थगिती,
