चिपळूण : संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग दुपदरी करण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सुमारे 263 किलोमीटर मार्गाच्या दुहेरी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल ( डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु आमच्या मागण्यानुसार कोकणातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न, चिपळूण दादर पॅसेंजर ची मागणी तसेच चिपळूण कराड रेल्वे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
सदरची मागणी पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे दुपदरीकारणाचे काम आम्ही होऊन देणार नाही. असे पत्राद्वारे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे. व ते पुढे म्हणाले की, कोकणातून ज्या रेल्वे गाड्या धावत आहेत त्याचा फायदा कोकणी माणसांपेक्षा परप्रांतीय प्रवाशांना जास्त होत आहे, हा आमच्यावर अन्याय आहे.
आम्ही कोकण रेल्वेच्या सिंगल पदरी व दुपदरीकरणासाठी साठी जागा दिल्या आहे, त्या आमच्या कोकणातील प्रवासाची गैरसोय करून सुपरफास्ट गाड्या धावण्यासाठी नाही, आमच्या मागणीप्रमाणे चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर सर्व सुपरफास्ट गाड्यांना थांबे व दादर चिपळूण स्वातंत्र्य गाडी सुरू करावी व अजूनही स्थानिकांच्या रेल्वे भरतीमध्ये स्थानिकांवर अन्याय होताना दिसत आहे. आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय दुपदरीकरण होऊ देणार नाही. असा इशारा कोकण रेल्वे समितीचे अध्यक्ष शौकत भाई मुकादम यांनी दिला आहे. मुकादम यांच्या इशारामुळे कोकण रेल्वे समोर मोठा पेठ निर्माण झाला आहे..
