मुंबई:- दि.14 एप्रिल 2026 रोजी चैत्यभूमी दादर मुंबई या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या थाटात संपन्न झाली. महाराष्ट्र शासन, मुंबई महानगर पालिका आणि पोलीस दल यांच्या वतीने चैत्यभूमीवर चोख बंदोबस्त करुन अनुयायांसाठी अभिवादन करण्याकरीता चोख व्यवस्था करण्यात आली होती.
बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरीता सका. 9.30 वा. दरम्यान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार ,श्री एकनाथ शिंदे राज्यपाल सन्मा.जिष्णु देव वर्मा आणि समाजकल्याण मंत्री श्री संजय शिरसाठ तसेच ईतर मंत्री,आजी- माजी खासदार,आमदार व अनेक मान्यवर उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.
यावेळी हेलिकॉप्टर मधुन चैत्यभूमीवर फुलांचा वर्षाव करुन शासनाच्या वतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.
मुंबई मनपा कला संगीत अकादमीने अनेक भिम गीतांचे गायन करुन अभिवादन केले.
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती चैत्यभूमीवर शासनाच्या वतीने मोठ्या थाटामाटात संपन्न
