म्हसळा ( महेश पवार ) : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांच्या भूमीमध्ये प्रत्येकाने संस्कृतीचा जतन करणे काळाची गरज आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम नेहमी करतो परंतु ते प्रत्येकाने रोजच्या जीवनामध्ये जोपासणे गरजेचे आहे आपण जोपासले तर उद्या आपली पिढी जोपासेल यावर्षी आपल्या प्रगती महिला मंडळ केलटे मुंबई ग्रामीण ता म्हसळा यांच्या वतीने रविवार दि 15 मार्च 2026 हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आले.

या वेळी सर्वांगीण कळागुणांना वाव मिळावा त्यांचा कळेला प्रतिसाद मिळावा त्यासाठी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्र हि संताची भुमी आहे त्या ठिकाणी भारतीय संस्कृती ठिकावी नविन पिढीला आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी की ज्या मुले आपला कटुंब सुसंस्कारित राहील या उद्दात हेतूने प्रथमच या वर्षी हुकाने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

त्यानंतर या वेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना सन्मान करण्यात आला ह्यावेळी या स्पर्धेचा आनंद सर्वांनीच घ्यावा त्या साठी म्हसळा तालुका कुणबी समाज यांना विशेष निमंत्रित केले होते त्या वेळी कुणबी समाजोन्नती संघ शाखा ता. म्हसळा मुंबई उपाध्यक्ष अनिल बांद्रे उपाध्यक्ष हेमंत रामाणे तालुका महिला मंडळ अध्यक्षा स्नेहा खापरे उपाध्यक्षा मृण्मयी शिर्के उपाध्यक्षा शिल्पा रामाणे खजिनदार राधिका कापेकर ठाकरोली विभाग सरचिटणीस सदानंद आग्रे तळवडे विभाग अध्यक्ष राकेश पेंढारी विभाग उपाध्यक्ष सतेज शिगवण विभाग अध्यक्षा करुणा काप विभाग सरचिटणीस तनिषा डिंगणकर , उपस्थिती लाभली ह्यावेळी ज्या मुलांनी आपली कला सादर केली त्यांना उत्कृष्ट सन्मानचिन्ह देण्यात आले व ज्या भगिनींनी उखाणा स्पर्धेत भाग घेतला होता त्यातून तीन स्पर्धेकांची निवड करून त्याना भेटवस्तू देण्यात आल्या शेवटी आलेल्या सर्वाना भोजनाची व्यवस्था करण्यात आली सदरचा कार्यक्रमाचे आयोजक ग्रामस्थ मंडळ केलटे यांनी केले होते.

अध्यक्ष राजू कासरुंग ग्रामीण उपाध्यक्ष किसन पवार सचिव ज्ञानेश्वर कोबनाक उपाध्यक्ष विजय बोर्ले सचिव राजू धाडवे विनोद गावडे खजिनदार नामदेव कासरुंग सखाराम पवार मा. अध्यक्ष गणपत सावंत दौलत पवार रामचंद्र चाचले पांडुरंग कासरुंग राकेश कोबनाक मिलिंद पवार दिनेश करंदेकर राजू जावळेकर नितीन बोर्ले किरण कोबनाक आदी ग्रामस्थ उपस्थित होते हा कार्यक्रम अध्यक्षा दर्पना दौ.कासरुंग यांच्या नेतृत्वात पार पडला व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शितल कासरुंग यांनी केले यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्षा रेश्मा कोबनाक, निलाक्षी कासरुंग संपर्कप्रमुख वैदेही बोर्ले, श्रावणी कोबनाक खजिनदार सुमन कासरुंग सहसचिव मीनाक्षी सावंत वर्षा कोबनाक श्रावणी पवार खजिनदार नीलम रटाटे, पूजा गिजे सल्लागार कुणबी समाज पनवेल महिला अध्यक्षा लीना रटाटे,स्नेहाली बोर्ले, सुजाता सावंत, स्वेता पवार मनाली भुवड, रिद्धी धाडवे, दीपिका पवार, रेश्मा कासरुंग जिनल बोर्ले दीपिका पवार व सर्व सभासद सदस्य यांच्या सहकार्याने संपन्न झाला
या वेळी महिला मंडळ यांनी ग्रामस्थ मंडळीचे विशेष कौतुक करुण आभार मानले.