मुंबई दि.14 – जाती धर्म प्रांत भाषे पेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे.आपण प्रथम भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीय आहोत अशी राष्ट्रप्रेमाचे शिकवण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.त्यांचे संविधानातील समतावादी भारत उभा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केले.
चैत्यभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त ना. रामदास आठवले यांनी सहकुटुंब महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.त्यानंतर पत्रकारांशी ना. रामदास आठवले यांनी संवाद साधला.यावेळी सौ.सीमाताई आठवले; जीत आठवले; रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; नागसेन कांबळे; कांतिकुमार जैन राजकुमार टाक चंद्रशेखर कांबळे सचिनभाई मोहिते; दयाल बहादुर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
