लांजा (गोविंद चव्हाण) : दोन ट्रकची समोरा समोर जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात आयशर ट्रक चालक जागीच ठार तर दोघेजन गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान वाटूळ-दाभोळे मार्गावर लांजा तालुक्यातील पालू फाटा नजदीक घडली.
मुजाहित गफूर मुजावर (वय- २६, रा. धोपेश्वर आंबेवाडी, राजापूर) असे अपघातात ठार झालेल्या आयशर ट्रक चालकाचे नाव आहे. अपघाताबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक (क्रमांक एम एच १० डी, टी ०८८३) हा दाभोळेहुन राजापूरच्या दिशेने निघाला होता. ट्रक विष्णू गोरख खांडेकर (वय- ४४, रा. सोमवाडी,गौडवाडी सांगोला, जि. सांगली) हा चालवत होता. तर मुजाहित मुजावर हा आपल्या ताब्यातील आयशर ट्रक (क्रमांक- एम एच ४३, बीसी-७६४०) घेऊन राजापूर येथुन दाभोळेच्या दशेने निघाला होता. दोन्हीही ट्रक दाभोळे- वाटूळ मार्गावरून जात असताना ट्रक लांजा तालुक्यातील पालू फाटा येथे आले असता भरधाव आयशर ट्रकने विरुद्ध बाजूला येऊन समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. अपघाताची भीषणता एवढी होती की आयशर ट्रकच्या समोरील बाजूचा अक्षरशः चक्काचुर झाला. आयशर ट्रक चालक मुजाहित हा केबिनमध्ये अडकुन पडला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना लांजा ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. आधील तपास लांजा पोलीस करत आहेत.
दोन ट्रकची सामोरा समोर धकड बसून चालक जागीच ठार; दोनजण गंभीर
