मुंबई : मत्स्य व बंदर विकास मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे साहेब यांची चिपळूण शहरातील विविध विकास कामाबद्दल चर्चा करण्यात आली.चिपळूण शहरातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास दिला .बहुचर्चित चिपळूण शहरातील भुयारी गटार योजने बाबत चर्चा झाली. आपण लवकरात लवकरच प्रस्ताव सादर करा ,सदर योजनेला ताबडतोब मंजुरी मिळवून दिली जाईल, असा विश्वास दिला . चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती शुभम पिसे नगरसेवक संदीप भिसे जिल्हा चिटणीस योगेश शिर्के माजी नगरसेवक विजय चितळे अर्बन बँक संचालक दिपा शेठ देवकर अमोल तटकरे हे यावेळी उपस्थित होते
चिपळूणमधील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही -मंत्री नितेश राणे यांची ग्वाही..!
