मुंबई : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांसाठी e-KYC प्रक्रियेत दुरुस्ती करण्याची संधी 30 एप्रिल 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासंदर्भात शासनाने परिपत्रक जारी केले असून लाभार्थींना ही अंतिम मुदत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली असली तरी कुटुंबातील सदस्य सरकारी, कंत्राटी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी असल्यासंबंधीचा पर्याय निवडताना काहींनी चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महिलांना आता ऑनलाईन माध्यमातून माहिती दुरुस्त करण्याची एकदाच संधी देण्यात आली आहे.

संबंधित महिलांनी ही प्रक्रिया 30 एप्रिलपूर्वी पूर्ण करणे अत्यावश्यक असून त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच दिलेल्या मुदतीत e-KYC न केल्यास योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांनी तातडीने आपली e-KYC प्रक्रिया तपासून आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन संबंधित कार्यालयाकडून करण्यात आले आहे.