खेड :- तालुक्यातील शेल्डी येथील रस्त्याच्या चढवायचे दोन एस.टी. बसमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात एका बसचे नुकसान झाले आहे. हा अपघात दि.२७ एप्रिल रोजी दुपारी २:२० वाजता शेल्डी गावठाण स्टॉपच्या पुढे १ किलोमीटर अंतरावरील शेल्डी वाकण चढामध्ये घडला.
मिळालेल्या माहितीनुसार., बसचालक फिर्यादी चंद्रशेखर दत्तात्रय जाधव (४७, चिपळूण डेपो, मूळ रा. भुईज, ता.वाई, जि. सातारा) हे आपल्या ताब्यातील ( क्रमांक – एमएच- २० बीएल ३४३३ घेऊन जात असताना शेल्डी येथील रस्त्याच्या चढावर वळणावरून समोरुन एस. टी. बस एम.एच.२० बीएल – २७७१ हि घेऊन येणाऱ्या संशयीत आरोपी भुजंग कचरु गर्कल (वय ४५, रा. घोघस – पारगांव , ता. शिरूर, जि. बीड ) यांनी आपल्या ताब्यातील एस.टी. बस रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता, चालवुन समोरुन येणा-या बसच्या उजव्या बाजूला धडक देऊन झालेल्या अपघातास व बसच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयीत आरोपी बसचालक भुजंग कचरु गर्कल याच्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.