चिपळूण : चिपळूण तालुक्यातील ओवळी सुकविलवाडी येथे एका ४ ते ५ फूट खोल नैसर्गिक डोहात अडकलेल्या रानगव्याची वनविभागाने सुरक्षित सुटका केली आहे. ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्याने राबविलेल्या या बचाव मोहिमेनंतर रानगव्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असून, वनविभागाच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही मोहीम विभागीय वन अधिकारी (चिपळूण) श्रीम. गिरीजा देसाई पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीम. प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये खालील सदस्यांचा समावेश होता.त्यामधे परिक्षेत्र वनाधिकारी एस.एस.खान, वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले आणि वाहनचालक नंदकुमार कदम व अजय बडदे.पोलीस पाटील अजिंक्य शिंदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप शिंदे, तसेच ग्रामस्थ सचिन शिंदे, शुभम शिंदे, संतोष शिंदे, लक्ष्मण झोरे, जानू झोरे आणि इतर अनेक सहकाऱ्यांनी या कार्यात मोलाचे योगदान दिले.