रायगड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वासांबे विभागाच्या वतीने आयोजित एका भव्य सोहळ्यात रायगडचे लोकनेते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या शुभहस्ते विविध जनहितार्थ विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. हा सोहळा मोहोपाडा येथील जनता विद्यालय परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.
​ ​शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचा विचार करून खासदार तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा येथील जनता विद्यालयात संगणक, प्रिंटर आणि इंटरॅक्टिव्ह पॅनल बसविण्यात आले आहेत. या सुविधेमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच डिजिटल शिक्षणाची दारे खुली झाल्याने पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी नियुक्ती करुन त्यांना खासदार सुनिल तटकरे यांच्याहस्ते निवडपत्र देण्यात आले.