लोटे :- मुंबई गोवा महामार्गावरील एक्सेल फाटा ( तलारी फाटा ) येथील महामार्गाच्या संपादित जागेवर अतिक्रमण करून केलेल्या पक्क्या बांधकामाला अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बांधकाम हटविण्याबाबत सूचना दिली गेली असून सात दिवसात बांधकाम हटवावे अन्यथा कारवाई केली जाईल असे आदेश दिले आहेत. प्रथम वर्ग सहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग रोहा-रायगड यांचे कडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण ( जमीन व रहदारी ) अधिनियम २००२ अंतर्गत ‘सात दिवसात आपण बांधकाम हटवले नाही तर आपणावर कारवाई केली जाईल’ अशा आशयाची नोटीस हे बांधकाम करणाऱ्यास दिली आहे. त्याच्या प्रती कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण, उपविभागीय अधिकारी खेड आणि चिपळूण, तहसीलदार खेड आणि चिपळूण, पोलीस निरीक्षक, खेड पोलीस ठाणे यांना पाठवल्या गेल्या आहेत. आता प्रत्यक्षात हे बांधकाम अतिक्रमण करणारा ग्रामस्थ स्वतः हटवीतो? की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्यावर कारवाई करून ते निष्कासित करते? याकडे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
