चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आयोजित चिपळूण नागरी प्रीमियर लीग २०२६ भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा ३० एप्रिल व १ मे या कालावधीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषमय वातावरणात पार पडली.

पतसंस्थेच्या ५० शाखांमधील कर्मचाऱ्यांसाठी खासकरून आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांमधील एकोपा, सांघिक भावना आणि क्रीडाभावना वृद्धिंगत होताना पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या अ गटात रत्नसिंधू इलेव्हन दक्षिण विभाग या संघाने विजेतेपद पटकावले, तर इलेव्हन फायटर पश्चिम या गटविजेत्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या ब गटात सलग तीन वर्षे विजेत्या राहिलेल्या वाशिष्ठी डेअरीच्या वाशिष्ठी इलेव्हन या संघावर चिपळूण सनराईझर्सने मात करून विजेतेपद पटकावले.