पुणे : देशातील सध्याची परिस्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेला देशाच्या सगळ्या नेत्यांची बैठक बोलवावी आणि त्याला प्रधानमंत्र्यांनी स्वतः हजर राहावे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
आदरणीय शरद पवार साहेब बोलताना म्हणाले की, गेल्या 3-4 वर्षात सर्व पक्षीय बैठका या झाल्या पण त्यातील एकाही बैठकीत पंतप्रधान नव्हते. पण एकंदर अशी स्थिती गंभीर आहे असे सांगण्याचे काम मुख्यमंत्री प्रधानमंत्री करत आहेत, तर तितक्याच गांभीर्याने सगळ्यांनी मिळून घ्यावी.असे आदरणीय शरद पवार साहेब बोलताना म्हणाले.
यावर सविस्तर बोलताना आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले की,पंतप्रधान सोमनाथच्या मंदिराच्या तिथे गेले, त्याचे काही नाही. पण तिथे जाऊन जे केले, विमान उडवले, 6 विमाने त्या ठिकाणी घेऊन शो केला. परिस्थिती गंभीर आहे तर सगळ्या पातळीवर दाखवली पाहिजे. सोनं खरेदी करू नका हे सांगणे याचा अर्थ एकच आहे की आपल्या रुपयाची जी वॅल्यू आहे ती घसरू द्यायची नाही. हा निर्णय चुकीचा आहे असे मी म्हणत नाही. पण एका बाजूला हे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला वेगळेच सुरू आहे. असेही आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले.