खेड : – तालुक्यातील सुसेरी येथील साळवी कुटुंबातील ३६ वर्षीय कर्तापुरुष स्वप्निल प्रदिप साळवी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाल्याने साळवी कुटुंबीय पूर्णपणे निराधार झाले आहे. येथील लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या माध्यमातून या कुटुंबास सामाजिक बांधिलकीतून घरगुती जिन्नस भेट स्वरूपात देऊन आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .
स्वर्गीय स्वप्निल साळवी यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुले, आई, वडिल असा परिवार आहे. येथील लायन्स क्लबच्या सामाजिक दायित्वाने साळवी कुटुंबिय भारावून गेले आहेत. निराधार झालेल्या साळवी परिवारास लायन्स क्लब ऑफ खेड सिटीकडुन लायन्स सभासद प्रसाद उर्फ पप्पू शेठ यांच्या माध्यमातून जिन्नस भेट देण्यात आल्या. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, झोनचेअरमन मिलिंद तलाठी, माजी अध्यक्ष रोहन विचारे, खजिनदार माणिक लोहार यांनी सुध्दा सामाजिक बांधिलकीतून जिन्नस भेट देऊन स्तुत्य उपक्रम राबविला. लायन्स क्लबच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
सुसेरी येथील निराधार साळवी कुटुंबास आधार ! खेड लायन्स क्लबने राबविला स्तुत्य उपक्रम
