खेड : तालुक्यातील कळबणी बुद्रुक गावातील हंबीर वाडीमधील बंद घराच्या किचन रूममधील ओट्यावरील खिडकीची काच फोडून अज्ञात चोरटय़ांनी घरामध्ये प्रवेश करून घरातील 32 इंची ओनिडा कंपनीचा टि.व्ही., 5000/- रपये किंमतीचा सुर्या कंपनीचा कुलर, 5000/- रूपये किंमतीची घरगुती साहित्याची दोन गोणी असा एकूण 30,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय व लबाडीच्या इराद्याने चोरल्याप्रकरणी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 320/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे अधिनियम 331(3), 331(4), 305(अ) अन्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घरफोडी रविवार दिनांक 20 सष्टेबर 2026 रोजी सायंकाळी 18.30 वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक 22 सष्टेबर 2026 रोजी सायंकाळी 19.00 वाजण्याच्या मुदतीत घडला असुन, या घरफोडीची फिर्याद रोशन रामकृष्ण हंबीर वय 40, मुळ रा. कळबणी बुद्रुक, हंबीर वाडी, ता खेड जि रत्नागिरी सध्या रा. बोरज-शिवफाटा, ता खेड जि रत्नागिरीत यांनी येथील पोलीस ठाण्यात दाखल केली असून, या घरफोडीच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.