लांजा : अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे लांजा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील बेनी धरणामध्ये अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामध्ये काही मुले बुडत असल्याची माहिती मिळताच, आम्ही तात्काळ उपलब्ध मनुष्यबळ तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व साहित्य व बोटीसह बेनी धरण येथे दाखल झालो. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवून बुडत असलेल्या एका व्यक्तीस सुरक्षित बाहेर काढण्यात आले व त्यास पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्सद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सदर आपत्ती व्यवस्थापन मोहीम सायं. १९.०० ते २०.०० या वेळेत राबविण्यात आली. यासाठी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, भालचंद्र रेवणे, होमगार्ड १०, पोलीस अंमलदार ०५, स्थानिक नागरिक, पोलीस पाटील भीमराज धनावडे तसेच जिजाऊ संस्थेची खाजगी ॲम्बुलन्स व त्यातील कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य केले.