चिपळूण (विशेष प्रतिनिधी): हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला संशयित आरोपी आणि TWJ चा संचालक संकेश घाग याला आज अखेर चिपळूण पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
संकेश घाग याला अटक करण्यात आल्याचे वृत्त चिपळूणमध्ये वाऱ्यासारखे पसरले आणि गुंतवणूकदारांनी न्यायालयाबाहेर एकच गर्दी केली. चिपळूण पोलिसांनी अटक करून त्याला कोर्टामध्ये हजर केले. गेल्या अनेक दिवसांपासून घाग हा बेपत्ता झाला होता. या कंपनीमध्ये हजारो गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून कंपनीच्या संचालकांनी हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून पोबारा केला होता. त्यामुळे आपले पैसे परत मिळावेत याकरिता गुंतवणूकदारांनी वेळोवेळी आंदोलने केली मात्र त्यांना यश मिळाले नाही. अखेर आज चिपळूण पोलिसांना यश मिळाले आणि संकेश घाग जेरबंद झाला.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
