खोपोली (धम्मशील सावंत)
:आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि स्वामीनी महिला प्रतिष्ठान खोपोली यांच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी राजामाता जिजाऊ पुरस्कार नवनिर्वाचित नगरसेविका सुवर्णाताई मोरे यांना देण्यात आला तर ज्ञानज्योती सावित्री बाई फुले पुरस्कार समाजसेविका सावित्री जाधव यांना पुरस्कार देण्यात आला.या
कार्यक्रमाला खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक अनिल सानप, दिनेश थोरवे, नगरसेविका रेश्मा गायकवाड, अश्विनी अत्रे, सुवर्णा मोरे, रुपाली जाधव,रुकसाना जळगावकर, सानिया शेख, श्रुती पालांडे, प्रतीक्षा रेटरेकर, स्वामींनी प्रतिष्ठान खोपोलीच्या अध्यक्षा कांचनताई जाधव, उपाध्यक्षा शीतल डोखले, सदस्या उज्वला वाघेला, आशा जाधव, सावित्री जाधव, संध्या जाधव, ताराराणी बिग्रेडच्या प्रदेश अध्यक्षा वंदना मोरे,
माजी नगरसेविका केविना गायकवाड, रेश्मा आंग्रे, आदिसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY